कापूस खरेदी सहा लाख क्विंटलवर
By Admin | Updated: February 22, 2015 00:36 IST2015-02-22T00:27:00+5:302015-02-22T00:36:26+5:30
जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सुरू असलेली कापूस खरेदी सहा लाख क्विंटलवर पोहोचली असून शनिवारपासून २८ फेब्रुवारीपर्यंत आता खरेदी बंद ठेवण्यात येणार आहे

कापूस खरेदी सहा लाख क्विंटलवर
जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सुरू असलेली कापूस खरेदी सहा लाख क्विंटलवर पोहोचली असून शनिवारपासून २८ फेब्रुवारीपर्यंत आता खरेदी बंद ठेवण्यात येणार आहे. तूर, गुळ, मोसंबीची आवक समाधानकारक असून नवीन ज्वारीची आवकही हळूहळू वाढू लागली आहे.
ऊन हळूहळू तापू लागले असून बाजारातील काही मालाची आवकही तुलनेने कमी झाली आहे. सीसीआयने सुरू केलेली कापूस खरेदी जालना बाजार समितीअंतर्गत मोठ्या प्रमाणावर झाल्याने सहा जिनिंगमध्ये कापूस ठेवायला जागा नाही. त्यामुळे आठवड्यातून काही दिवस खरेदी बंद ठेवावी लागत आहे.
भोकरदन, अंबड आणि जालना येथील खरेदी टप्प्याटप्प्याने बंद ठेवून पूर्ववत सुरू केली जात आहे.
बाजारात तुरीची आवक समाधानकारक असून शुक्रवारी १७०० क्विंटल आवक झाली. गहू १३०० ते १५९० रुपये प्रतिक्विंटल, ज्वारी १२०० ते २३०१ रुपये, बाजरी १०३० ते १२८० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी होत आहे. मका ११३० ते १२३७, तूर ४८५० ते ६४००, हरभरा २५०० ते ३६९३, सोयाबीन ३२०० ते ३३२५ रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी होत आहे. मोसंबीची खरेदी १६०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचली. तर गुळाची खरेदी २०३० ते २४२५ रुपये प्रतिक्विंटल या दराने होत आहे.