शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

कापसाची आवक वाढली

By admin | Updated: February 9, 2015 00:43 IST

जालना : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत सुरू असलेले जिल्ह्यातील सात कापूस खरेदी केंद्रे चार दिवसांमध्ये पुन्हा बंद पडली आहेत.

जालना : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत सुरू असलेले जिल्ह्यातील सात कापूस खरेदी केंद्रे चार दिवसांमध्ये पुन्हा बंद पडली आहेत. जिल्ह्यातील खरेदी केंद्रांची संख्या कापूस साठविण्यासाठी कमी पडू लागल्याने शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिवसेंदिवस मुक्काम ठोकावा लागत आहे. जिल्ह्यात ५ फेबु्रवारीपर्यंत सीसीआय केंद्रांवर ४ लाख ३१ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. ३९५० रुपये दराने ही खरेदी होत आहे. सीसीआयने १५ नोव्हेंबर २०१५ पासून ही खरेदी केंद्रे सुरू केली. यामध्ये मुलचंद फुलचंद, गायत्री जिनिंग, किल्ला जीन, बन्सल जिनिंग, एनसीसी फायबर, वृषभ कॉटन आणि मराठवाडा जिनिंग या ठिकाणी ही खरेदी सुरू आहे. जिल्ह्यात या सातही केंद्रांवर अडीच महिन्यांच्या काळात कापूस खरेदीला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. जिनिंग कारखान्यांवर कापूस ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे २४ जानेवारी ते १ फेबु्रवारी या काळात खरेदी बंद ठेवावी लागली. २ तारखेपासून खरेदी सुरू झाली, परंतु चार दिवसात ५८ हजार क्विंटल खरेदी झाल्याने ६ तारखेपासून ही खरेदी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आली.जालना २२ हजार, भोकरदन व परतूर प्रत्येकी १ लाख ६० हजार क्विंटल, मंठा १ लाख तर अंबड येथे ८० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. शेतकऱ्यांचा प्रतिसाद अजुनही सुरूच असून बाजार समिती कार्यालयात पावती फाडण्यासाठी आलेल्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. (प्रतिनिधी)काजळा ता. बदनापूर येथील शेतकरी सखाराम जाधव म्हणाले, शुक्रवारपासून आपण कापसाचा माल घेऊन बाजार समितीच्या आवारात आलो, मात्र अद्याप नंबर लागला नाही. एक-दोन दिवसात खरेदी सुरू होईल, असे सांगितल्याने मी वाहनासह येथेच थांबलो आहे. जालना बाजार समितीचे सचिव गणेशराव चौगुले म्हणाले, सीसीआयच्या कापूस खरेदीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कापसाची आवक वाढल्याने सातही जिनिंगवर सध्या कापूस ठेवायला जागा नाही. मात्र सोमवारी ही केंद्रे पूर्ववत सुरू होतील.