कापसाच्या गाठी जळून खाक
By Admin | Updated: February 8, 2016 00:11 IST2016-02-07T23:57:14+5:302016-02-08T00:11:45+5:30
तीर्थपुरी : तीर्थपुरी येथील महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे असलेल्या गोदामातील कापसाच्या गाठींना गोदामाचे शटर वर करून अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्यात पणन महासंघाच्या ८८ गठाण जळाल्या.

कापसाच्या गाठी जळून खाक
तीर्थपुरी : तीर्थपुरी येथील महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे असलेल्या गोदामातील कापसाच्या गाठींना गोदामाचे शटर वर करून अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्यात पणन महासंघाच्या ८८ गठाण जळाल्या.
याच गोदामातील बाजूला असणाऱ्या ५३ गठाण मात्र गाावकऱ्यांनी वेळीच पाण्याने आग आटोक्यात आणल्याने वाचल्या. सदर गोदाम हे बुलडाणा अर्बन बँकेने चालविण्यासाठी घेतले. त्यात साडे बारा लाखांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजता घडली.
महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे तीर्थपुरी येथे ८ हजार कापसाच्या गठाण साठवण करण्याची क्षमता असणारे गोदाम आहे. पणन महासंघाच्या त्यात ७ हजार गाठी ठेवण्यात आल्या होत्या. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात इसमाने गोदामाचे दक्षिणेकडील शटर वर करुन आत प्रवेश केला.
गोदाम क्रमांक २ मध्ये एका ठिकाणी ८८ तर दुसऱ्या बाजूला ५३ गठाण ठेवल्या होत्या. दोन्ही गोदामाच्या मध्ये २० फुटांची भिंत असताना ८८ गठाण असणाऱ्या ठिकाणी वरून जाऊन त्यास आग लावल्याचे दिसत होते.
या आगीत ८८ गठाण जळाल्या. १६५ किलोची एक गठाण होती. जवळपास १२ लाख ३२ हजारांचे नुकसान झाल्याचे बुलडाणा बँकेचे जिल्हा गोदाम व्यवस्थापक प्रकाश अंबडकर यांनी सांगितले.
यावेळी समर्थचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, माजी सभापती तात्यासाहेब चिमणे, व्यापारी देवीलाल बजाज यांनी तातडीने आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या समर्थ कारखाना व नगर परिषद अंबडच्या गाड्या बोलावल्या. गावातील बापू जगले, बाळू कोरडे, संतोष फटींग, बळी फलके, अशोक पवार यांनी अगोदर आग आटोक्यात आणली.