दुष्काळझळांना कंटाळून पेटविली मोसंबीची बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:55 IST2019-02-20T00:55:02+5:302019-02-20T00:55:34+5:30
दुष्काळाच्या झळांमुळे मोसंबीचे पीक हातातून गेल्याने हतबल झालेल्या पोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी जड अंत:करणाने मंगळवारी तब्बल ४५० झाडांवर कुºहाड चालविली. यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला असून, तळहातावरच्या फोडांप्रमाणे जपलेल्या मोसंबीला जळण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता, अशी खेदजनक प्रतिक्रिया येथील शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

दुष्काळझळांना कंटाळून पेटविली मोसंबीची बाग
लोकमत न्यूज नेटवर्क
कचनेर : दुष्काळाच्या झळांमुळे मोसंबीचे पीक हातातून गेल्याने हतबल झालेल्या पोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी जड अंत:करणाने मंगळवारी तब्बल ४५० झाडांवर कुºहाड चालविली. यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला असून, तळहातावरच्या फोडांप्रमाणे जपलेल्या मोसंबीला जळण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता, अशी खेदजनक प्रतिक्रिया येथील शेतकºयांनी व्यक्त केली आहे.
पैठण तालुक्यातील पोरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी मोसंबीचे पीक घेतले होते.
पाणी कमी पडल्यानंतर विहिरी खोदून तसेच बोअर घेऊन पिके जगविली. तसेच दरवर्षी मिळेल तेथून पाणी आणून झाडे जगविली. मात्र, यावर्षी अत्यल्प पावसाने येथील तलाव, नदी, नाले, बंधारे कोरडेठाक झाले आहेत. यामुळे पीक हातातून गेल्याने येथील एका शेतकºयाने आपल्या शेतातील तब्बल ४५० मोसंबीच्या झाडांवर कुºहाड चालवून तोडून टाकले.
विशेष म्हणजे तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेली ही फळबाग पाहवत नसल्याने या शेतकºयाने तोडलेल्या झाडांना आग लावून पेटवून नष्टही केल्याचे दिसून आले. यावरून यावर्षी दुष्काळाची दाहकता किती मोठी आहे. हे दिसून येत आहे.
येथील शेतकरी पाराजी संपत गायकवाड यांनी सांगितले की, यंदा दुष्काळाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतातील ४५० झाडांवर कुºहाड चालविण्याची वेळ आली. विशेष म्हणजे पाणी कमी पडल्याने बँकेकडून कर्ज काढून ठिबकचे पाईप विकत घेतले होते. मात्र, आता विहीर, बोअर, नदी, नाले कोरडेठाक पडल्याने झाडांना पाणी कुठून देणार असा प्रश्न निर्माण झाला होता, तर दुसरीकडे वैद्यकीय खर्च तसेच घर चालविणे सध्या कठीण झाल्यामुळे मोसंबी तोडून जाळण्याशिवाय पर्याय नव्हता, अशी प्रतिक्रिया सदर शेतकºयाने दिली.