कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:36+5:302020-12-17T04:29:36+5:30

जिल्हाधिकारी : पदवीधर निवडणुकीप्रमाणे काळजी घेणार औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर निवडणुकीचा खर्च वाढला. त्याच धर्तीवर ग्रामपंचायतीची निवडणूक ...

The cost of Gram Panchayat elections will increase against the backdrop of Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च वाढणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च वाढणार

जिल्हाधिकारी : पदवीधर निवडणुकीप्रमाणे काळजी घेणार

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर निवडणुकीचा खर्च वाढला. त्याच धर्तीवर ग्रामपंचायतीची निवडणूक होणार असल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दावा केला की, या निवडणुकीत देखील पदवीधर निवडणुकीप्रमाणे काळजी घेतली जाणार आहे. निवडणुकीचे व्यवस्थापन तहसील पातळीवर असते, त्यामुळे निवडणुकांचा तालुकानिहाय प्रोटोकॉल ते पाहतील. जिल्हाधिकारी म्हणून सर्व सूचना आणि मार्गदर्शन केल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ६१८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान आणि १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. ११ डिसेंबरपासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ७ ग्रामपंचायतींच्या तसेच डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या ६११, अशा एकूण ६१८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १८ जानेवारीपर्यंत लसीकरण मोहिमेचे शेड्युल्ड ठरविण्यात जिल्हा प्रशासनाची धावपळ होणार आहे. शासकीय यंत्रणा निवडणूक कामात अडकलेली असेल, सोबतच लसीकरण मोहीम देखील राहणार आहे.

अधिसूचना आज निघणार

१५ डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना निघणार आहे. सोमवारी शासकीय कला महाविद्यालय येथून मतदान यंत्र तहसील पातळीवर कंटनेरमधून पोहोचविण्यात आले. तालुकानिहाय ग्रामपंचायतीच्या गरजनेनुसार ईव्हीएम देण्यात येणार आहेत. अधिसूचनेनंतर मतदान केंद्र, सुरक्षित अंतरासाठी मार्किंग, सॅनिटायझर, मास्क आदी बाबींबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Web Title: The cost of Gram Panchayat elections will increase against the backdrop of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.