शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेने केली उदगीरकरांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 00:26 IST

चेतन धनुरे , उदगीर उदगीर शहराच्या भीषण टंचाईत पालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे़ परंतु, आपण उदगीरकरांसाठी काहीतरी करतोय् हे

चेतन धनुरे , उदगीरउदगीर शहराच्या भीषण टंचाईत पालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे़ परंतु, आपण उदगीरकरांसाठी काहीतरी करतोय् हे दाखविण्याच्या घाई झालेल्या पालिकेने अतिउत्साहात टँकरचे वेळापत्रक जाहीर केले़ परंतु, गेल्या दोन दिवसांपासून पाण्याअभावी टँकरच बंद असल्याने वेळापत्रक सपशेल खोटे पडले अन् पालिकेला अतिउत्साहात तोंडावर पडण्याची वेळ आली़ उदगीर शहरात पाण्याची भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेची मागणी शासनाने उडवून लावल्यामुळे सध्या आहे त्या स्त्रोतातून पाणी मिळविण्यासाठी उपाय योजना राबविल्या जात आहेत़ विहिरींचा गाळ काढण्याची मोहिम अर्ध्यातच सोडून दिल्यानंतर आता दोन दिवसांपूर्वीच टँकरचे वेळापत्रक नगरपालिकेने जाहीर केले़ त्यात ६ फेब्रुवारीपासून ते २८ फेब्रुवारी पर्यंत कोणत्या भागात कोणत्या तारखेस टँकरने पाणी पुरविण्यात येईल, याची माहिती जाहीर करण्यात आली आहे़ परंतु, या वेळापत्रकाच्या पहिल्याच दिवसापासून पालिकेला ‘बोले तैसे चाल’ण्यात अपयश आले आहे़ त्यामुळे संबंधित प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी पुन्हा इतरांची ‘पाऊले वंदावी’ लागली़ आता तांत्रिक अडचणीचे कारण देत प्रशासन सारवासारव करु पाहत असले तरी या अडचणींचा अंदाज न घेताच वेळापत्रक जाहीर करण्याचा अतिउत्साह त्यांना चांगलाच अंगलट येत आहे़ आधीच टंचाईच्या वणव्यात भाजून निघालेल्या उदगीरकरांच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार पालिकेने केल्याची चर्चा होवू लागली आहे़ लातूर शहरातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर तेथील टँकरवर निगराणी ठेवण्यासाठी काही नगरसेवकांनी पुढाकार घेवून प्रभागात दक्ष नागरिकांच्या समित्या स्थापन केल्या आहेत़ त्यांच्याद्वारे टँकर नियोजित वेळापत्रकानुसार येतो की नाही यावर लक्ष ठेवून पाण्याचे समान वितरण करण्यात येत आहे़ त्याच पार्श्वभूमीवर उदगीरातही अशा समित्या स्थापन करण्याची गरज आहे़ अन्यथा पाण्यासाठी होणारी भांडणे अन् त्यातून निर्माण होणाऱ्या समस्येला पालिकेसोबतच पोलिसांनाही तोंड द्यावे लागणार आहे़ मात्र, उदगीरच्या नगरसवेकांनी अजून तरी याबाबतीत कुठे पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही़