CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादमधील समतानगरमध्ये एक पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या ३० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 14:50 IST2020-04-19T14:47:30+5:302020-04-19T14:50:55+5:30
समतानगर येथील राहणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण

CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादमधील समतानगरमध्ये एक पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या ३० वर
औरंगाबाद : शहरात एककीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त होताना नवीन रुग्ण समोर येत आहे. शहरात रविवारी आणखी एका कोरोनाबाधीताची भर पडली आहे.
समतानगर येथील राहणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगीतले. त्यामुळे औरंगाबादेतील बाधीतांचा आकडा ३० वर पोहचला आहे. परिणामी शहरात आणखी एका हॉटस्पॉटमध्ये भर पडली आहे. हा व्यक्ती कोठून आला, कोणापासून बाधा झाली याबाबत माहिती घेतली जात आहे. शहरातील कोरोनाबाधीतांचा आकडा काही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपासून बाधीतांचा आकडा कमी झाला होता.त्यात आता आणखी वाढ झाली.
दरम्यान, समतानगर येथील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची हिस्टरी तपासण्याचे काम महापालिकेने आता सुरू केले आहे.