coronavirus : चिंताजनक ! औरंगाबादच्या ९ % भागाला कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 07:04 PM2020-05-15T19:04:48+5:302020-05-15T19:07:35+5:30

येणारे १४ दिवस अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन गस्त वाढविणार आहे. 

coronavirus: Worrying! 9% of Aurangabad is under cover of coronavirus | coronavirus : चिंताजनक ! औरंगाबादच्या ९ % भागाला कोरोनाचा विळखा

coronavirus : चिंताजनक ! औरंगाबादच्या ९ % भागाला कोरोनाचा विळखा

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात पोलिसांची गस्त वाढणार  १२ कंटेन्मेंट झोनवर निगराणी

औरंगाबाद : शहरात ९ टक्के भाग सध्या कोरोनाच्या विळख्यात आहे. १७३ चौरस किलोमीटरपैकी केवळ १४ चौरस किलोमीटर परिसरात कोरोनाचे रुग्ण आहेत. नवीन १२ कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कडक करण्याबाबतचा निर्णय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत आयुक्तालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

शहरातील ९ टक्के क्षेत्र कोरोना बाधित झाले आहे. त्यामुळे शहरातील परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे. सध्या असलेल्या कंटेन्मेंट झोनमधून कोरोनाचा प्रादुर्भाव इतरत्र होऊ नये यासाठी लॉकडाऊन अधिक कडक करण्यात येईल. येणारे १४ दिवस अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन गस्त वाढविणार आहे. कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची नोंदही घेणार आहे.

जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, मनपाचे शहर अभियंता एस. डी. पानझडे, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, टास्क फोर्स पथकप्रमुख विधि सल्लागार अपर्णा थेटे यांची होती.

बैठकीत झालेले निर्णय असे 
कंटेन्मेंट झोनच्या सीमा सील करणार, नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी राहणार, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करणार, पोलिसांची पेट्रोलिंग वाढविणार, झोनमधून ये-जा करणऱ्यांची नोंद ठेवली जाणार, आरोग्य पथकामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार, समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक यांना सोबत घेऊन नागरिकांशी संवाद साधणार, दुचाकी, चारचाकी वाहनांना बंदी घालणार, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच आरोग्य सुविधा पुरविणार, बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणार, या भागाचा दररोज अहवाल घेण्याबाबत कार्यवाही यापुढे करण्याबाबतचा निर्णय झाला आहे. 

Web Title: coronavirus: Worrying! 9% of Aurangabad is under cover of coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.