Coronavirus : औरंगाबादमध्ये आणखी दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू; आतापर्यंत २९ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 11:56 IST2020-05-17T11:55:40+5:302020-05-17T11:56:10+5:30
घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू

Coronavirus : औरंगाबादमध्ये आणखी दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू; आतापर्यंत २९ बळी
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोरोना बाधीत २ महिलांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत २९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले.
कोरोनाबाधित असलेल्या शंभू नगर येथील ३५ वर्षीय महिलेचा रविवारी सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच संजय नगरातील ५२ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा शनिवारी सायंकाळी ७.४५ वाजता मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब, दम्याचा त्रासही होता.