coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यु; आतापर्यंत ४१ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:06 IST2020-05-21T14:06:40+5:302020-05-21T14:06:59+5:30
मृत्यूनंतर दोघांचे अहवाल पोझिटिव्ह

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यु; आतापर्यंत ४१ बळी
औरंगाबाद ः दोन रुग्णांचा कोरोनामुळे बुधवारी (दि. २०) मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या बळीचा आकडा ४१ झाला आहे. आसेफिया कॉलनी येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा तर रहेमानिया कॉलनीतील ६५ वर्षीय वृद्धाचा या मृत्यूत समावेश आहे. मृत्यूनंतर या दोघांचे अहवाल प्राप्त झाल्याचे घाटीचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
आसेफिया कॉलनी येथील ४८ वर्षीय पुरूषाला मंगळवारी घाटीत भरती करण्यात आले होतेय उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांच्या स्वॅबचा अहवाल बुधवारी सायंकाळी ५.२० वाजता पाॅझीटीव्ह प्राप्त झाला. दोन्ही बाजुंचा न्युमोनीया, कोरोना व हायपरटेन्शनमुळे त्यांचा मृत्यु झाल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. रहेमानिया कॉलनीतील ६५ वर्षीय वृद्धाला बुधवारी घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना काही तासांतच म्हणजे सकाळी सव्वा दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू पश्चात स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल पाॅझिटीव्ह असल्याचे रात्री स्पष्ठ झाले.