CoronaVirus : औरंगाबादकरांना धक्का ! हिलाल कॉलनीत तीन महिला कोरोनाबाधित, रुग्ण संख्या ४७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 07:41 IST2020-04-25T07:40:45+5:302020-04-25T07:41:24+5:30

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 47 वर पोहचली

CoronaVirus: Shocks to Aurangabadkars! In Hilal Colony, three women were infected with corona disease | CoronaVirus : औरंगाबादकरांना धक्का ! हिलाल कॉलनीत तीन महिला कोरोनाबाधित, रुग्ण संख्या ४७ वर

CoronaVirus : औरंगाबादकरांना धक्का ! हिलाल कॉलनीत तीन महिला कोरोनाबाधित, रुग्ण संख्या ४७ वर

औरंगाबाद : हिलाल कॉलनी येथील तीन महिलांचा कोव्हीड१९तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १८, २६ आणि ३१ असे त्या महिलांचे वय आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.

हिलाल कॉलनीतील मृत्यू झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे स्क्रिनिंग महापालिकेकडून सुरू आहे. त्यातील तिन महिलांचे अहवाल शनिवारी पहाटे पॉझिटिव्ह आले. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ४७ वर पोहचली. यातील २२ जण कोरोनामुक्त झाले असुन पाच जणांचा मृत्यु झाला आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या २० झाली असून पाॅझिटीव्ह रुग्णांपैकी समता नगरातील कोरोनाबाधीतांची संख्या आठवर पोहचली. संपर्कातून बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. समतानगर, भीमनगर भावसिंगपुरा पाठोपाठ हिलाल कॉलनीत आता शहरातील सातवे हॉटस्पॉट बनले आहे.

Web Title: CoronaVirus: Shocks to Aurangabadkars! In Hilal Colony, three women were infected with corona disease