CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचा दुसरा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 14:26 IST2020-04-14T14:26:06+5:302020-04-14T14:26:40+5:30

घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय वृद्धाचा आज मृत्यू झाला.

CoronaVirus: Shocking! Corona's second death in Aurangabad | CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचा दुसरा बळी

CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचा दुसरा बळी

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाने आणखी एकाचा बळी घेतला. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय वृद्धाचा आज मृत्यू झाला.

२ एप्रिल रोजी पुण्याहून आलेल्या ३९ वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर ६८ वर्षीय व्यक्तीचा सोमवारीच अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते घाटी रुग्णालयात ते उपचारासाठी ८ एप्रिल रोजी दाखल झाले होते. त्यांचा तपासणीचा अहवाल ९ एप्रिल रोजी निगेटिव्ह आला होता. त्यांचा ११ एप्रिल रोजी पुन्हा स्वब घेण्यात आला. हा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. 
शहरात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २४ वर गेला आहे. यामध्ये ५ एप्रिल रोजी एका ५८ वर्षीय कोरोनाबाधित बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता.

Web Title: CoronaVirus: Shocking! Corona's second death in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.