CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ३५ वर, तीन जण आढळले पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 15:36 IST2020-04-21T15:35:19+5:302020-04-21T15:36:04+5:30
समतानगर येथील आणखी दोघांना, तर बिस्मिल्ला कॉलनीतील एकाला लागण

CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ३५ वर, तीन जण आढळले पॉझिटिव्ह
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मंगळवारी ३२ वरून ३५ वर गेली. समतानगर येथील आणखी दोघांना, तर बिस्मिल्ला कॉलनीतील एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
समतानगर येथील १८ वर्षीय आणि २० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बिस्मिला कॉलनीतील ४० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी समतानगर येथील राहणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. त्याच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात आली. त्यात या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे नातेवाईक आणि संपर्कातील १३ लोकांचा अहवाल मंगळवारी सकाळी निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. परंतु त्यानंतर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त होत आहे.