CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा सातवा बळी; ७७ वर्षीय मृत महिलेचा स्वॅब पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 16:34 IST2020-04-28T16:33:19+5:302020-04-28T16:34:05+5:30

किले अर्क येथील महिला मृत

CoronaVirus: Seventh death of corona in Aurangabad; 77-year-old dead woman's swab positive | CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा सातवा बळी; ७७ वर्षीय मृत महिलेचा स्वॅब पॉझिटिव्ह

CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा सातवा बळी; ७७ वर्षीय मृत महिलेचा स्वॅब पॉझिटिव्ह

औरंगाबाद : किलेअर्क येथील ७७ वर्षीय संशयित महिलेचा मृत्यू झाल्यावर स्वब घेण्यात आल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोव्हीड 19 पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची संख्या ७ वर पोहचली आहे.

किलेअर्क येथील ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्या महिलेला रात्री दीड वाजता घाटीत आणण्यात आले. निवासी डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. महिलेच्या घरासमोरील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या महिलेच्या घरातील सर्वांना अलगिकरण कक्षात हलवण्यात आले होते. मृत्यू जाहीर केल्यावर डॉक्टरांनी संशयित म्हणून स्वॅब घेतला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे घाटीचे उप अधिष्ठाता डॉ कैलास झिने यांनी सांगितले.त्यामुळे शहरातील कोरोना मृत्यूचा आकडा सात वर पोहचला आहे.आता महापालिका आणि पोलिसांना कळवुन मृतदेह नातेवाईकांना देण्यात येईल असे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुरेश हरबडे म्हणाले.

Web Title: CoronaVirus: Seventh death of corona in Aurangabad; 77-year-old dead woman's swab positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.