CoronaVirus : औरंगाबादेत कोरोनाग्रस्तांची वाढ वेगाने; आणखी ११ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या १२०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 08:29 IST2020-04-29T08:27:47+5:302020-04-29T08:29:36+5:30
गारखेडा या नव्या हॉटस्पॉटची भर

CoronaVirus : औरंगाबादेत कोरोनाग्रस्तांची वाढ वेगाने; आणखी ११ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या १२०
औरंगाबाद : शहरात कोरोनाग्रस्तांची वाढ वेगाने होत आहे. बुधवारी सकाळी ११ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात नूर कॉलनी ११, गारखेडा १ व भीमनगर १ अशी रुग्ण संख्या असल्याची माहिती डॉ.येळीकर यांनी दिली.यासोबतच शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १२० वर गेली आहे.
कोरोना बाधितांच्या संपर्कातील रुग्णात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. यात नवीन हॉटस्पॉटची भर पडत असल्याने शहर समुह संसर्गाच्या उंबरठ्यावर आले आहे. बुधवारी सकाळी नूर कॉलनी ११, गारखेडा १ व भीमनगर १ अशी रुग्ण संख्या वाढली आहे. यात गारखेडा या नव्या हॉटस्पॉटची भर पडली आहे. यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.