CoronaVirus : जिल्हा रुग्णालयाने पाठविलेला रुग्ण घाटीने पाठविला माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 13:34 IST2020-04-21T13:32:29+5:302020-04-21T13:34:32+5:30
घाटी रुग्णालयात कोरोनाचे गंभीर रुग्ण दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

CoronaVirus : जिल्हा रुग्णालयाने पाठविलेला रुग्ण घाटीने पाठविला माघारी
औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयातून गंभीर रुग्ण म्हणून पाठविण्यात आलेल्या रुग्णाला माघारी पाठविण्याचा प्रकार सोमवारी घडला. सदर रुग्ण स्थिर असल्याने परत पाठविल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी एका ६५ वार्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या महिलेला अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या रुग्णाला घाटीत नेण्यात आले. घाटी रुग्णालयात कोरोनाचे गंभीर रुग्ण दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे रुग्णाला पुन्हा जिल्हा रुग्णालयात नेण्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे रुग्णास पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, रुग्णाला हलविण्यापुर्वी फोनवर डॉक्टरांनी संपर्क केला पाहिजे. सदर रुग्ण स्थिर होता. त्यामुळे परत पाठविले.