coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ६०० च्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 17:01 IST2020-08-18T17:00:26+5:302020-08-18T17:01:34+5:30

जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या सुद्धा १९ हजाराच्या उंबरठ्यावर पोहोंचली आहे

coronavirus: The number of corona deaths in Aurangabad district is on the threshold of 600 | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ६०० च्या उंबरठ्यावर

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ६०० च्या उंबरठ्यावर

ठळक मुद्देसध्या ४१८४ जणांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मृत रुग्णांची संख्या ५९८ झाली आहे.

शहरात उपचारादरम्यान रांजणगाव येथील ४२ वर्षीय पुरुष, सिद्धार्थ उद्यान येथील ७३ वर्षीय महिला, बिडकीन-पैठण येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.

जालना जिल्ह्यातील रुग्णाचा मृत्यू
घाटीत जामखेड (जालना) येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास ११ ऑगस्ट रोजी घाटीत दाखल करण्यात आहे. उपचार सुरू मंगळवारी पहाटे या रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्याची रुग्णसंख्या १९ हजाराच्या उंबरठ्यावर
जिल्ह्यातील १४६ रुग्णांचे अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८,९९९ 18,999 एवढी झाली आहे. त्यापैकी १४,२१७ रुग्ण बरे झाले तर ५९८ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४१८४ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

Web Title: coronavirus: The number of corona deaths in Aurangabad district is on the threshold of 600