Coronavirus : लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर आता घरी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 21:26 IST2020-06-07T21:25:08+5:302020-06-07T21:26:05+5:30
संबंधित रुग्णांच्या घरी स्वतंत्र रुम, स्वतंत्र स्वच्छतागृह आणि घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असणे आवश्यक आहे.

Coronavirus : लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर आता घरी उपचार
औरंगाबाद : लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांच्या संमतीनुसार होम आयसोलेशन केले जात आहे. म्हणजे अशा रुग्णांवर घरीच उपचार होतील. शहरात आतापर्यंत २० रुग्णांवर घरीच उपचार करण्यात आल्याची माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
संबंधित रुग्णांच्या घरी स्वतंत्र रुम, स्वतंत्र स्वच्छतागृह आणि घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असणे आवश्यक आहे. रुग्णाच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जाईल. प्रकृतीत काही बिघाड झाला तर उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले जाईल.
शहरात कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अशा रुग्णांवर मनपाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार केले जातात. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. घरीच उपचारास परवानगी दिली जात असल्याने हा ताण कमी केला जात असल्याचे दिसते.