coronavirus : औरंगाबादमध्ये २८ बाधितांची वाढ; १२७६ झाली एकूण रुग्णसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 21:50 IST2020-05-24T08:57:36+5:302020-05-24T21:50:34+5:30
१३ महिला, १५ पुरुषांना बाधा झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले.

coronavirus : औरंगाबादमध्ये २८ बाधितांची वाढ; १२७६ झाली एकूण रुग्णसंख्या
औरंगाबाद : शहरात २८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ रविवारी (दि २४) सकाळी झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२७६ झाली असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
शहरामध्ये न्याय नगर, गारखेडा २, टाऊन हॉल १, सईदा कॉलनी, जटवाडा रोड ३, कैलास नगर ४, राम नगर, एन-2, सिडको ४, नारळीबाग १, गौतम नगर, जालना रोड १, संभाजी कॉलनी, सिडको १, महेश नगर १, जुना बाजार १, एमजीएम परिसर १, भवानी नगर, जुना मोंढा १, शंकुतला नगर, शहानूरवाडी १, औरंगपुरा २, आशियाद कॉलनी, बीड बायपास १, वडगाव कोल्हाटी २, अब्दाशहा नगर (सिल्लोड)- १ या भागात बाधित आढळून आले आहेत.