शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

CoronaVirus : 'हॅलो...आवाज सून रहे हो बेटा, तुम अच्छे हो ना'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 18:39 IST

कोरोना पॉझिटिव्ह आईची तीन दिवसांच्या मुलीसोबत व्हिडियो कॉलिंगद्वारे संवाद

ठळक मुद्देमोबाईलवर पाहिला मातेने बाळाचा चेहरा कोरोना पॉझिटिव्ह महिलेने चार दिवसांपूर्वी दिला मुलीस जन्मखबरदारी म्हणून आई व बाळाला वेगळे ठेवण्यात आले आहे

-  संतोस हिरेमठ 

औरंगाबाद : 'हॅलो...आवाज सून रहे हो बेटा, तुम अच्छे हो ना, असे म्हणत 'ती' आपल्या अवघ्या ३ दिवसांच्या मुलीकडे नजर भरून पहात होती. हा प्रसंग होता जिल्हा सामान्य रुग्णालयातील. 

कोरोनाबाधित आईने मंगळवारी नवजात मुलीसोबत व्हिडीओ कॉलिंगद्वारे संवाद साधला. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल जोगेश्वरी पश्चिम (मुंबई) येथून रुग्णवाहीकेने औरंगाबाद गाठणाऱ्या कोरोनाबाधित गरोदर महिलेची १८ एप्रिल रोजी सिजर प्रसूती झाली. या महिलेने मुलीला जन्म दिला. अशाप्रकारची देशातील दुसरी आणि राज्यातील पहिलीच प्रसूती ठरली. प्रसूतीनंतर या बाळाला कोरोनाची लागण झाली की नाही झाली, अशी चिंता सर्वांनाच होती. अखेर या नवजात शिशुचा अहवाल निगेटिव्ह आला आणि वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन अध्याय लिहला गेला. 

बाळाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून जन्मानंतर मुलीला आईपासून दूर नवजात कक्षात ठेवण्यात आले आहे. नवजात मुलीला डॉक्टर, परिचारिका आईचे दूध पाजत आहेत, परंतु ती आईच्या प्रेमापासून, आईच्या मायेच्या उबेपासून वंचित झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाला सामोरे जाणारी तिची आई तिच्या काळजीने चिंतेत आहे. जन्मानंतर डॉक्टरांनी शिशुचा चेहरा दाखविला होता. परंतु कोणतीही आई आपल्या लेकरापासून क्षणभरही दूर राहू शकत नाही. परंतु नियतीने या मातेवर ही वेळ आणली आहे. आईची तळमळ पाहून डॉक्टरांनी आधी मुलीचा फोटो, व्हिडीओ काढून दाखविला. त्यातून आईला समाधान झाले. परंतु मुलीसाठी तिची ओढ कायम आहे. कधी भेट होईल, अशी ती विचारणा करीत आहे. यावर तोडगा म्हणून डॉक्टर, परिचरिका यांनी मंगळवारी मोबाईल व्हिडीओ कॉलिंगद्वारे या दोन्ही माय-लेकींची भेट घडवून आणली. एक मोबाईल आईजवळ आणि दुसरा मोबाईल लहान मुलीजवल डॉक्टरांनी धरला आणि सुरू झाला दोघांचा संवाद. सुरुवातीला काही सेकंद ही माता आपल्या मुलीकडे पहातच राहिली. त्यानंतर 'हॅलो म्हणत, 'आवाज सून रहे हो, मुलीला साद घातली. 'तुम अच्छे हो ना' असे म्हणताच नवजात कक्षातील प्रत्येक जण स्तब्ध झाला. 

अनेक संवाद सहज ऐकू येत नव्हते. परंतु आई आणि मुलगी एकटक एकमेकांकडे पहात होते. काही मिनिटांतच हा संवाद थांबला. आईबरोबर ही भेट घडवून आणणाऱ्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मोठे समाधान होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. भारती नागरे यांच्यासह रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर, परिचारिका या बाळाची काळजी घेत आहे. निगेटिव्ह अहवालाची प्रतीक्षा २६ एप्रिलनंतर आई- मुलीची भेट सदर महिलेवरील उपचारास २६ एप्रिल रोजी १४ दिवास पूर्ण होतील. तेव्हा आईचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यास या आई आणि मुलीची भेट होईल, अशी आशा आहे. फोटोओळ.. कोरोनाबाधित आई आणि कोरोनामुक्त मुलीची मोबाईलद्वारे अशी भेट झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद