CoronaVirus : आनंदवार्ता ! कोरोनाबाधित महिलेस झाले कन्यारत्न; प्रसूतीची देशातील दुसरीच घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 13:38 IST2020-04-18T13:23:48+5:302020-04-18T13:38:00+5:30
औषधोचार देवूनही नैसर्गिक प्रसुती होत नसल्याने सिझेरीयनचाच पर्याय होता.

CoronaVirus : आनंदवार्ता ! कोरोनाबाधित महिलेस झाले कन्यारत्न; प्रसूतीची देशातील दुसरीच घटना
औरंगाबाद ः जिल्हा रुग्णालया भरती जोगेश्वरी पश्चिम (मुंबई) येथून रुग्णवाहीकेने औरंगाबाद गाठणार्या कोरोनाबाधित गर्भवती महिलेच्या प्रसुतीकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर या महिलेची सिजर प्रसूती झाली असून, मुलगी झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
महिलेचे गर्भावस्थेचे पुर्ण दिवस भरुन सहा दिवस झाले होते. औषधोचार देवूनही नैसर्गिक प्रसुती होत नसल्याने सिझेरीयनचाच पर्याय होता. मात्र, गर्भवती महिला प्रसुतीला संमती देत नसल्याने डाॅक्टरांसमोर पेच निर्माण झाला होता.
चिनमध्ये चार, इंग्लंडला एक, दिल्लीत एक अशी कोरोनाबाधित प्रसुती झालेल्या महिलांची माहीती इंटरनेटवरुन मिळते आहे. त्यामुळे माहीतीनुसार राज्यातील पहिली तर देशातील दुसरी महिला असल्याने या प्रसुतीकडे लक्ष लागले होते. बाळाला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी बालरोग तज्ज्ञही लक्ष ठेवून आहेत.