CoronaVirus : औरंगाबादकरांसाठी आनंदावार्ता ! जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे आणखी ७ रुग्ण कोरोमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 14:16 IST2020-04-19T14:14:26+5:302020-04-19T14:16:39+5:30
२३ कोरोनाबाधीतांपैकी ९ रुग्णांचा १४ दिवस उपचार कालावधी पुर्ण झाला आहे.

CoronaVirus : औरंगाबादकरांसाठी आनंदावार्ता ! जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे आणखी ७ रुग्ण कोरोमुक्त
औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या २३ कोरोनाबाधीतांपैकी ९रुग्णांचा १४ दिवस उपचार कालावधी पुर्ण झाला आहे. यापैकी ७ रुग्णांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे एकाच दिवशी औरंगाबादेत ७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाच्या विळख्यात जिल्हा रुग्णालयात गेल्या १४ दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या ९ करोनाबधितांपैकी ८ जणांचा अहवाल शनिवारी निगेटिव्ह आला. या ८ जणांचे शनिवारी आणखी एक स्वब घेण्यात आला. त्यात ७ जनांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आता त्यांची रुग्णालयातून सुटी होईल.