शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

CoronaVirus : खेळ अपूर्ण राहिला; ऑक्सिजन बेड वेळेवर न मिळाल्याने राष्ट्रीयस्तरावरील खेळाडूचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:53 PM

CoronaVirus: नाशिक येथे बेड उपलब्ध नसल्याने शेवटी त्याला घरीच उपचार घ्यावे लागले.

सोयगाव : योग्यवेळी ऑक्सिजन बेड न मिळाल्याने नाशिक येथे सोयगाव येथील शुटींग व्हॉलीबॉलमधील राष्ट्रीय खेळाडू सुशील सुनील पाटील याचे अवघ्या २४ व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. या घटनेमुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. याची वार्ता सोयगावात धडकताच शहरात शोककळ पसरली होती. 

सुशीलला दि.२२ एप्रिलला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते,त्याचा एच.आर.सी.टी स्कोर एक होता. नाशिकला उपचार घेण्याचा विचार केला. परंतु, बेड उपलब्ध नसल्याने शेवटी त्याला घरीच उपचार घ्यावे लागले. सुशीलला श्वास घेण्यास त्रास व्होऊ लागल्याने ओझरमधील खासगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी उपचारा यंत्रणा अपूर्ण होती, ऑक्सिजनही उपलब्ध नव्हता. यामुळे दि.२८ एप्रिलला त्याला नाशिकच्या एस.एम.बी.टी वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.नीरज मोरे, डॉ. रुचिरा, डॉ. पटेल त्याच्यावर उपचार करत होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे महागडी औषधी उपलब्ध करून देण्यात आली.

सुशीलच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. परंतु, दि .३ मे रात्री बारा वाजेच्या सुमारास हृदय विकाराचा झटका आल्याने सुशीलचे निधन झाले. बी.एस्सी अग्रीचा पदवीधर असलेल्या सुशीलला क्रीडा क्षेत्रात चुणूक दाखवून सोयगावचा नावलौकिक वाढविण्याची इच्छा होती. त्याला वेळेवर बेड मिळाला असता तर चित्र वेगळे राहिले असते अशी खंत अजूनही सुशीलच्या कुटुंबियांना वाटते. घरचा सधन, कोटीचा विमा आणि कुटुंबियांची खर्च करण्याची तयारी असूनही केवळ वेळेवर बेड न मिळाल्याने ओझर ते नाशिक धावपळ करावी लागल्याने एका राष्ट्रीय खेळाडूला आयुष्याचा खेळ २४ व्या वर्षी सोडावा लागला. 

औषधांचा काळाबाजार सुरूच आहे शासन पातळीवर एका राष्ट्रीय खेळाडूसाठीही बेड उपलब्ध नव्हता ही अत्यंत खेदजनक बाब आहे. नाशिक शहरासह राज्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. सरकारी यंत्रणेच्या कमजोरीमुळे सुशील सारख्या खेळाडूचा मृत्यू झाला आहे. रेमडेसिविर व टोसिलीझुमब इंजेक्शनचा राज्यभर काळाबाजार सुरूच आहे. याकडे शासन पातळीवरून लक्ष नसून रेमडेसिविर २५ हजार रु आणि टोसिलीझुमब दोन ते अडीच लक्ष रुपये मोजून घ्यावे लागत आहे. सुशीलच्या उपचारासाठी धावपळ करतांना हा अनुभव आम्ही घेतला असे मृत सुशीलचे काका सोयगावचे माजी उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांनी सांगितले. मात्र, शासनाला याचे गांभीर्य नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू