coronavirus : औरंगाबादेत चार कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 16:45 IST2020-08-21T16:44:44+5:302020-08-21T16:45:24+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ८५१ एवढी झाली आहे.

coronavirus : औरंगाबादेत चार कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
औरंगाबाद : शहरातील चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या चार मृत्यूमुळे जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यूची संख्या ६२१ झाली आहे.
मृतांमध्ये चिखलठाणा येथील ७५ वर्षीय स्त्री, लेबर कॉलनी येथील ४२ वर्षीय स्त्री, मयूर नगर ( हर्सूल) येथील ४८ वर्षीय पुरुष आणि चौधरी कॉलनी ( चिखलठाणा ) येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
शुक्रवारी आढळले ११७ रुग्ण
जिल्ह्यातील ११७ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ८५१ एवढी झाली आहे. त्यापैकी १४ हजार ९२७ रुग्ण बरे झाले तर ६२१ जणांचा मृत्यू झाल्याने ४३०३ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.