coronavirus : औरंगाबादमध्ये चार बाधितांचा मृत्यू; कोरोनाबळींची संख्या १६२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 04:30 PM2020-06-16T16:30:50+5:302020-06-16T16:32:00+5:30

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९१८ झाली आहे.

coronavirus: Four corona patients die in Aurangabad; The number of corona deaths are 162 | coronavirus : औरंगाबादमध्ये चार बाधितांचा मृत्यू; कोरोनाबळींची संख्या १६२ वर

coronavirus : औरंगाबादमध्ये चार बाधितांचा मृत्यू; कोरोनाबळींची संख्या १६२ वर

googlenewsNext

औरंगाबाद :  शहरात उपचारादरम्यान चार बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने मंगळवारी दिली. यामुळे जिल्हातील बाधितांच्या मृत्यूचा आकडा १६२ वर गेला आहे.

विश्रांतीनगर येथील ३५ वर्षीय महिलेचा सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता, रोझाबाग येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा रात्री नऊ वाजता, मध्यरात्रीनंतर एक वाजता इटखेडा येथील ७५ वर्षीय वृद्धाचा तर ४९ वर्षीय महिलेचा मंगळवारी सकाळी ९.४० वाजता मृत्यू झाला.

बाधितांची संख्या ३ हजाराच्या घरात 
जिल्ह्यात ९३  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या २९१८ झाली आहे. यापैकी १५५१  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

मंगळवारी येथे आढळले रुग्ण 
मुकुंदवाडी १, कैसर कॉलनी १,  बेगमपुरा २,  चेलीपुरा १,  उस्मानपुरा १,  रेहमानिया कॉलनी १,  ईटखेडा २,  चिखलठाणा ४,  वैजापुर १,  गारखेडा परिसर ४,  खोकडपुरा १,  न्यु विशाल नगर १,  बायजीपुरा १,  आंबेडकर नगर २,  बंजारा कॉलनी २,  एस.टी. कॉलनी १, एन-९ सिडको ३, पुंडलिक नगर ३, छत्रपती नगर २, जिन्सी राजा बाजार २, शहानुरवाडी ११, जवाहर कॉलनी ११, जालान नगर १, वडजे रेसिडेन्सी १, सिल्क मिल कॉलनी १, शिवाजीनगर २, रोजा बाग दिल्ली गेट २, बन्सीलाल नगर १, बालाजी नगर १, भाग्यनगर ३, कोहिनुर कॉलनी १, एन-११ सिडको ३, जयभवानी नगर १, गादीया विहार २, दिवानदेवडी १, सिडको १, वाहेगाव १, एन-११, टिव्ही सेंटर १, शांतीपुरा, छावणी १, रहिम नगर १, प्रकाश नगर १, बुध्द नगर १, हडको, टिव्ही सेंटर १, सुधाकर नगर १, न्यु हनुमान नगर १, दुधड १, कानडगांव, ता. कन्नड १, देवगांव रंगारी १,लक्ष्मीनगर १, वाळुज १. यामध्ये ५४ पुरूष आणि ३९ महिला रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: coronavirus: Four corona patients die in Aurangabad; The number of corona deaths are 162

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.