coronavirus : हर्सूल कारागृहात आणखी १४ पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 19:08 IST2020-06-10T19:07:35+5:302020-06-10T19:08:21+5:30
यापूर्वी हर्सूल जेलमध्ये २९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

coronavirus : हर्सूल कारागृहात आणखी १४ पॉझिटिव्ह आढळले
औरंगाबादेत हर्सूल कारागृहातील आणखी १४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये २ अधिकारी आणि १२ कर्मचारी असल्याची माहिती आहे. त्याबरोबरच आरोग्य उपसंचालक कार्यालयातील दोघे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
हर्सूल कारागृहात शनिवारी कोरोनाने शिरकाव केला. येथील २९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात आता आणखी १४ जणांची भर पडली आहे. कारागृहातील २ अधिकारी आणि १२ कर्मचारी बुधवारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
तसेच आरोग्य उपसंचालक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मंगळवारी कार्यालयातील १० कर्मचाऱ्यांचे तपासणीसाठी स्वब घेण्यात आले. यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे