coronavirus : पाच कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू; एकूण मृतांची संख्या ४९७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 16:03 IST2020-08-05T16:02:51+5:302020-08-05T16:03:34+5:30

जिल्ह्यातील ५८ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले.

coronavirus: five coronavirus patients die during treatment; Total death toll at 497 | coronavirus : पाच कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू; एकूण मृतांची संख्या ४९७ वर

coronavirus : पाच कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू; एकूण मृतांची संख्या ४९७ वर

ठळक मुद्देसध्या ३३४७ जणांवर उपचार सुरु आहेत

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुलढाणा येथील एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ४ कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मयत रुग्णांची संख्या ४९७ झाली आहे.

वडोदबाजार-फुलंब्री येथील ५३ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६१ महिला, छावणीतील ६७ वर्षीय पुरुष, एन-६, संभाजी कॉलनीतील ५० वर्षीय पुरुष आणि चिकली-बुलढाणा येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला, अशी माहिती घाटी प्रशासनाने दिली.

आज ५८ रुग्णांची वाढ 
जिल्ह्यातील ५८ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५, २०८ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११,३६८ रूग्ण बरे झाले आहेत, तर ४९७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३४७ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: coronavirus: five coronavirus patients die during treatment; Total death toll at 497