coronavirus : तीन बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना बळींची संख्या ४७८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 13:30 IST2020-08-01T13:29:11+5:302020-08-01T13:30:21+5:30
आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४,१९२ एवढी झाली आहे.

coronavirus : तीन बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना बळींची संख्या ४७८
ठळक मुद्देसध्या ३५२५ जणांवर उपचार सुरु
औरंगाबाद : तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या तीन मृत्यूमुळे जिल्ह्यात आतापर्यत मृतांचा आकडा ४७८ झाला आहे.
मृतांमध्ये बजाज नगर येथील ४५ वर्षीय पुरुष, रांजणगाव येथील ६५ वर्षीय पुरुष तर सिल्क मिल कॉलनी येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतात समावेश आहे.
आज ६९ रुग्णांची वाढ
जिल्ह्यातील ६९ रुग्णांचे अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४,१९२ एवढी झाली आहे. त्यापैकी १०,१९२ बरे झाले तर ४७५ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३५२५ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.