Coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक; तब्बल ७४ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ८२३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 09:42 IST2020-05-15T09:42:07+5:302020-05-15T09:42:37+5:30
शहरात नवीन तसेच जुन्या भागातून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे

Coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक; तब्बल ७४ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ८२३
औरंगाबाद : शहरात शुक्रवारी सकाळी तब्बल ७४ कोरोनाबाधितांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८२३ वर गेली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
शहरातील आज एन सहा,सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (1), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन कॉलनी (3), न्याय नगर (7), कैलास नगर (1), पुंडलिक नगर (8),सिल्क मील कॉलनी (6), हिमायत नगर (5), चाऊस कॉलनी (1), भवानी नगर (4), हुसेन कॉलनी (15), प्रकाश नगर (1)
शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1), हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2), रहेमानिया कॉलनी (2), बायजीपुरा (5), हनुमान नगर (1), हुसेन नगर (1), अमर सोसायटी (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1) या भागातील कोरोनाबाधित आढळून आले आहेत.