coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार पार; आणखी ६४ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 09:23 IST2020-06-07T09:22:35+5:302020-06-07T09:23:12+5:30
आतापर्यंत ९९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ७२९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार पार; आणखी ६४ रुग्णांची वाढ
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (दि.७) ६४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २०१४ झाली आहे. यापैकी ११८६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. ९९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ७२९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
नव्या आणि कोरोनामुक्त भागात शिरकावाचे सत्र सुरूच असून बाधितांचा आकडा दोन हजाराच्या पार गेला. मृत्यूचा आकडा शंभरीच्या घरात पोहचले आहेत. तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या सातशेपार गेली आहे. त्यामुळे रुग्णालये, आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढच असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांत भावसिंगपुरा १, बजाजनगर, वाळूज १, हिना नगर, रशीदपुरा १, सातारा परिसर १, बौद्ध नगर १, मिल कॉर्नर ११, रोजा बाग १, देवदूत कॉलनी, बजाज नगर १, देवानगरी १, पद्मपुरा १, एन नऊ, रेणुका माता मंदिर परिसर १, एन तीन सिडको १, सिंधी कॉलनी १, मुजीब कॉलनी रोशन गेट १, नंदीग्राम कॉलनी, गारखेडा १, शिवाजी नगर १, रवींद्र नगर, टिळक नगर जवळ १, भीमनगर, जवाहर कॉलनी १, जुना मोंढा १, शिवशंकर कॉलनी, साई नगर ३, मुकुंदवाडी १, संत ज्ञानेश्वर नगर, एन –नऊ १, तक्षशील नगर, मोंढा ३, संभाजी कॉलनी एन सहा १, चिश्तिया कॉलनी २, पैठण गेट २, पुंडलिक नगर, गल्ली नं. नऊ १, आंबेडकर नगर, गल्ली नं. नऊ ३, ठाकरे नगर १, आंबेडकर नगर, एन-सात २, बायजीपुरा २, जटवाडा रोड १, जुना मोंढा, भवानी नगर १, नागसेन कॉलनी, बायजीपुरा १, न्यू हनुमान नगर १, बारी कॉलनी १, आंबेडकर चौक, पिसादेवी रोड २, कैलास नगर १, शहानूर मियाँ दर्गाह परिसर, ज्योती नगर जवळ १ आणि देवशी पिंपळगाव, गंगापूर १, बोरवाडी, खुलताबाद १ या भागातील बाधीत आहेत. आज आढळलेल्या बाधितांमध्ये २७ महिला आणि ३७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.