CoronaVirus : औरंगाबादेत कोरोनाचा चौथा बळी; ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 00:24 IST2020-04-22T00:22:36+5:302020-04-22T00:24:54+5:30
मृत्यूनंतर घेतलेल्या स्वबचा अहवाल आला १३ तासानंतर पॉझिटिव्ह

CoronaVirus : औरंगाबादेत कोरोनाचा चौथा बळी; ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा मंगळवारी चौथा बळी गेला. भीमनगर- भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा घाटीत उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. मृत्यूनंतर तापणीसाठी घेण्यात आलेल्या स्वबचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याची माहिती मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.
सदर महिला १९ एप्रिल रोजी दुपारी १.४० वाजता बेशुद्ध अवस्थेत घाटीतील अपघात विभागात दाखल झाल्या होत्या. यावेळी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण केवळ ५० टक्के होते. त्यामुळे त्यांना अपघात विभागातच कृत्रिम श्वास सूरु करून कोव्हिड इमारतीमधील अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याची प्रकृती बिघडत गेली आणि मंगळवारी सकाळी ७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एका दिवसात चार रुग
शहरात आतापर्यंत ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे तिन्ही रुग्ण घाटीत दाखल होते. या महिलेच्या मृत्यूने कोरोनाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ४ वर गेली आहे. शहरात मंगळवारी एकूण ४ रुग्ण समोर आले. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६ वर गेली.