coronavirus : ३ वर्षाच्या मुलाचा कोरोनाने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 18:47 IST2020-08-17T18:44:45+5:302020-08-17T18:47:11+5:30

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मृत रुग्णांची संख्या ५९१ झाली.

coronavirus: Corona kills 3-year-old boy in Aurangabad | coronavirus : ३ वर्षाच्या मुलाचा कोरोनाने घेतला बळी

coronavirus : ३ वर्षाच्या मुलाचा कोरोनाने घेतला बळी

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना ३ वर्षाच्या कोरोनाबाधित मुलाचा मृत्यू झाला. या मुलासह जिल्ह्यातील ४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मृत रुग्णांची संख्या ५९१ झाली.

समता कॉलनी - वाळूज येथील ३ वर्षीय मुलाला घाटीत १४ ऑगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा कोरोनाचा अहवाल याच दिवशी पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. या मुलासह एन-११, हडको येथील ४९ वर्षीय पुरुष, फुलंब्री येथील ७० महिला आणि घाटशेंद्रा-कन्नड येथील ७१ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली.

जिल्ह्याची रुग्णसंख्या १८ हजार ८०१ 
जिल्ह्यात सोमवारी सकाळी १२ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८,८०१ एवढी झाली आहे. त्यापैकी १३, ८८४ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या ४३२५ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: coronavirus: Corona kills 3-year-old boy in Aurangabad