CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा आलेख वाढतोय; आणखी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 19:37 IST2020-04-08T19:36:33+5:302020-04-08T19:37:06+5:30
यासोबतच शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या 17 वर गेली आहे

CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा आलेख वाढतोय; आणखी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
औरंगाबाद : शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज आणखी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, आज प्राप्त झालेल्या अहवालात सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनाग्रस्तांच्या संख्येत शहरात दिवसेंदिवस वाढ होत असून आज एकाच दिवसात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे शहरात कोरोनाची रुग्ण संख्या १७ वर गेली आहे.