coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या ७१४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 19:21 IST2020-09-02T19:20:38+5:302020-09-02T19:21:03+5:30

एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३, ६९४ झाली आहे.

coronavirus: Corona death toll rises to 714 in Aurangabad district | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या ७१४ वर

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या ७१४ वर

औरंगाबाद : शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु असताना बुधवारी ९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली. यातील दोन रुग्ण जालना जिल्ह्यातील असून सात औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनाबळींची संख्या ७१४ वर गेली आहे. 

शासकीय रुग्णालयात घाटी येथे नूतन वसाहत-जालना येथील ७५ वर्षीय पुरुष, बीड बायपास-अबंड येथील ७० वर्षीय महिला, शेवराई-गंगापूर येथील ५५ वर्षीय पुरुष आणि अलापूरवाडी-वैजापूर येथील ५५ वर्षीय महिला, बीडकीन- पैठण येथील ५२ वर्षीय पुरुष, बंजारा कॉलनीतील ६६ वर्षीय महिला,  शेवता- फुलंब्री येथील ७० वर्षीय महिला, मधुमतीनगर, रांजणगाव शेंपूंजी येथील ७० वर्षीय पुरुष, अखातवाडा-पैठण येथील ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३, ६९४ झाली आहे. यातील आतापर्यंत १८, ५९६ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ७१४ झाली आहे. आजघडीला ४३८४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

Web Title: coronavirus: Corona death toll rises to 714 in Aurangabad district