coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या ६५० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 19:17 IST2020-08-26T19:15:57+5:302020-08-26T19:17:45+5:30

एकूण रुग्णसंख्या २१, ५१५ एवढी झाली आहे

coronavirus: Corona death toll rises to 650 in Aurangabad district | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या ६५० वर

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या ६५० वर

ठळक मुद्देबुधवारी सायंकाळपर्यंत पाच बाधितांचा मृत्यू

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी तिघांचा मृत्यू झाल्यानंतर सायंकाळी आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्याची कोरोना बळीचा आकडा ६५० वर पोहंचला आहे.

दुपारी पिसादेवी -हर्सूल येथील ६० वर्षीय महिला, एन-११, सिडको येथील ७० वर्षीय महिला आणि एकतानगर-हर्सूल येथील ६३ वर्षीय महिला या तीन बाधितांच्या मृत्युनंतर सायंकाळी भारतनगर येथील ३५ वर्षीय पुरुष आणि बिडकीन-पैठण येथील ५४ वर्षीय पुरुष अशा दोन बाधितांचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली.  

आज १२३ बाधितांची वाढ
जिल्ह्यात बुधवारी १२३  बाधितांची वाढ झाली तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या २१, ५१५ एवढी झाली आहे. आतापर्यंत १६, ४४० रूग्ण बरे झाले आहेत. तर ६५० जणांचा मृत्यू  झाला आहे. सध्या ४४२५ जणांवर उपचार सुरू आहेत.

 

Web Title: coronavirus: Corona death toll rises to 650 in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.