coronavirus : औरंगाबादेत कोरोना हजार पार ; ५९ नव्या रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 08:48 IST2020-05-18T08:47:56+5:302020-05-18T08:48:42+5:30

राज्यात मुंबई पुण्यानंतर औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे

coronavirus: corona crosses thousand mark in Aurangabad; Increase of 59 new patients | coronavirus : औरंगाबादेत कोरोना हजार पार ; ५९ नव्या रुग्णांची वाढ

coronavirus : औरंगाबादेत कोरोना हजार पार ; ५९ नव्या रुग्णांची वाढ

औरंगाबाद : शहरात सोमवारी ( दि. १८ ) आणखी ५९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यात  कोरोनाबाधितांची एकूण संख्या १०२१ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबाद शहरात नव्याने आढळलेल्या रुग्णांत पैठण गेट, सब्जी मंडी (१), किराडपुरा (१), सेव्हन हिल कॉलनी (१), एन-६ सिडको (१), बायजीपुरा (१), रोशन नगर (१), न्याय नगर (३), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.२ (४), हुसेन कॉलनी (४), पुंडलिक नगर (२), हनुमान नगर (१), संजय नगर, गल्ली नं. पाच (१), हिमायत बाग, एन-१३ ‍सिडको (१), मदनी चौक (२), सादाफ कॉलनी (१), सिल्क मील कॉलनी (८), मकसूद कॉलनी (६), जुना मोंढा (११), भवानी नगर (५), हिमायत बाग, जलाल कॉलनी (३), बेगमपुरा (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये २८ महिला व ३२ पुरुषांचा समावेश आहे.

Web Title: coronavirus: corona crosses thousand mark in Aurangabad; Increase of 59 new patients