CoronaVirus : कोरोनाचा कहर ! ५ नव्या हॉटस्पॉटसह औरंगाबादची रुग्णसंख्या ३५६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 16:27 IST2020-05-06T16:26:22+5:302020-05-06T16:27:58+5:30

दुपारपर्यंत ३५ नव्या रुग्णांची भर

CoronaVirus: Corona blast ! With 5 new hotspots, Aurangabad has 356 patients | CoronaVirus : कोरोनाचा कहर ! ५ नव्या हॉटस्पॉटसह औरंगाबादची रुग्णसंख्या ३५६ वर

CoronaVirus : कोरोनाचा कहर ! ५ नव्या हॉटस्पॉटसह औरंगाबादची रुग्णसंख्या ३५६ वर

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बुधवारी दुपारी ३५६ झाली. सकाळी २८ आणि दुपारी ७ असे ३५ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले.

कबाडीपुरा येथे ५, दत्तनगर -कैलासनगर येथे ४, बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनी येथे एक, हक टॉवर, रेल्वेशेस्टेशन रोड येथे एक आणि कबीरनगर-उस्मानपुरा, सातारा रोड येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. यासह पूर्वी रुग्ण आढळून आलेल्या जयभीमनगर येथे ७, बायजीपुरा येथे ४ , संजयनगर-मुकुंदवाडी येथे ७, पुंडलीकनगर येथे ३ , बेगमपुरा येथे एकाचा  अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबधितांची संख्या ३५६ झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. कुलकर्णी यांनी सांगितले.

५१ भागांत आढळले रुग्ण
आतापर्यंत शहरातील ४६ भागांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आता ५ नव्या भागांमुळे ही संख्या ५१ झाली आहे. यात ४० भागांतील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ११ भागांत काही रुग्ण कोरोनामुक्त तर काहींचा मृत्यू झालेला आहे.
 

Web Title: CoronaVirus: Corona blast ! With 5 new hotspots, Aurangabad has 356 patients