coronavirus In Aurnagabad : शहरातील तीन बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना बळींची संख्या ४६७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 14:45 IST2020-07-30T14:44:14+5:302020-07-30T14:45:50+5:30
जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा १३,६६२ झाला आहे.

coronavirus In Aurnagabad : शहरातील तीन बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना बळींची संख्या ४६७ वर
औरंगाबाद : तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाने गुरुवारी दिली आहे. या तीन मृत्यूमुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा ४६७ झाला आहे.
कोरोनामुळे उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये विश्रांती नगर ४६ वर्षीय पुरुष, आविष्कार कॉलनी एन ६ येथील ७५ वर्षीय पुरुष तर खोकडपुरा येथील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आज ९६ बाधितांची वाढ
जिल्ह्यातील ९६ रुग्णांचे गुरुवारी सकाळी पाॅझीटीव्ह आले. यात ग्रामीण भागातील ७३ तर मनपा हद्दीतील २३ जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अँटीजनचाचणीद्वारे आढळलेल्या ६५ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा १३,६६२ झाला आहे. त्यापैकी ९६८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ४६७ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ३५८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.