CoronaVirus : औरंगाबादमध्ये धोका वाढतोय; सलग तिसऱ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:44 IST2020-04-09T18:42:57+5:302020-04-09T18:44:23+5:30
शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या १८ वर

CoronaVirus : औरंगाबादमध्ये धोका वाढतोय; सलग तिसऱ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
औरंगाबाद : शहरात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १८ वर गेली आहे. किराडपुऱ्यातील एक ५९ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याची माहिती आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णालयाची रोज भर पडत असल्याने शहरात याचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी मंगळवारी ३ आणि बुधवारी सुद्धा ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आजच्या एका रुग्णासह शहरात कोरोनाचे १८ रुग्ण झाले आहेत.