Coronavirus : औरंगाबाद हादरले ! ४५ मिनीटात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 20:16 IST2020-05-15T20:16:21+5:302020-05-15T20:16:51+5:30
नविन हनुमान नगर, बायजीपुरा येथील वृद्धांचा समावेश

Coronavirus : औरंगाबाद हादरले ! ४५ मिनीटात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यु
औरंगाबाद ः शहरातील नविन हनुमान नगर आणि बायजीपुरा येथील दोन वृद्धाचा कोरोनामुळे शुक्रवारी (दि. १५) झाला आहे. घाटी रुग्णालयात अवघ्या ४५ मिनीटात हे दोन मृत्यु झाले. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा २३ झाला असल्याची माहीती माध्यम समन्वयक डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
नविन हनुमाननगर गल्लीनंबर १ दुर्गामाता मंदिर परिसरातील ७४ वर्षीय वृद्ध कोरोना पाॅझीटीव्ह असल्याने जिल्हा रुग्णालयात भरती होते. तब्बेत बिघडल्याने त्यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजता घाटी रुग्णालयात हवण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असतांना ३.४५ वाजता त्यांचा मृत्यु झाला. त्यांना तीव्र अडथळ्याचा फुफ्फुसाचा आजारासोबत उच्चरक्तदाबाने त्यांचा मृत्यु झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
बायजीपुरा येथील ७० वर्षीय वृद्धाला १० मे रोजी सव्वा दोन वाजता घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब पाॅझीटीव्ह आला होता. त्यांचा शुक्रवारी दुपारी तीन वाजता मृत्यु झाला. कोरोनामुळे त्यांच्या विविध अवयवांचे कार्य प्रभावित झाले होते. दोन्ही बाजुंचा न्युमोनिया, हृदयविकारही होता. त्यामुळे त्यांचा मृत्यु झाल्याचा अहवाल डाॅक्टरांनी दिला आहे.