Coronavirus In Aurangabad : फिरत्या पथकांमुळे शहरात वाढली स्वॅबची संख्या; पॉझिटिव्हचे प्रमाण होतेय कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 19:55 IST2020-07-06T19:50:01+5:302020-07-06T19:55:06+5:30
१ जुलै रोजी महापालिकेने ६१८ लाळेचे नमुने प्राप्त केले होते. २ रोजी ७२९, ३ तारखेला ६९८, तर ४ जुलै रोजी ७८९ संशयित रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले.

Coronavirus In Aurangabad : फिरत्या पथकांमुळे शहरात वाढली स्वॅबची संख्या; पॉझिटिव्हचे प्रमाण होतेय कमी
औरंगाबाद : महापालिकेने शहरात कोरोना संशयितांच्या लाळेचे नमुने (स्वॅब) घेण्याचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त केले आहे. शनिवारी दिवसभरात ७८९ संशयितांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. रविवारी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून दीडशे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासणीवर भर दिला आहे. दोन दिवसांपासून त्यांनी नागरिकांच्या तपासणीसाठी दहा फिरते पथक तैनात केले आहेत. दररोज दीडशे ते दोनशे लाळेचे नमुने केवळ फिरत्या पथकांकडून प्राप्त होत आहेत. याशिवाय एमजीएम, पदमपुरा याठिकाणीही नागरिकांनी स्वत: लाळेचे नमुने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
१ जुलै रोजी महापालिकेने ६१८ लाळेचे नमुने प्राप्त केले होते. २ रोजी ७२९, ३ तारखेला ६९८, तर ४ जुलै रोजी ७८९ संशयित रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. नमुने घेण्याचे प्रमाण आणखी वाढविण्यात यावे, अशी सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्यामुळे लाळेचे नमुने घेण्याची संख्या लवकरच एक हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनपाने सुरु केलेल्या १३ फिवर क्लिनिकमध्ये चार महिन्यांत तब्बल ६ हजार ६०७ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.