CoronaVirus : औरंगाबाद चारशे पार; ७२ एसआरपीएफ जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह,रुग्णसंख्या ४६८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 10:32 IST2020-05-08T10:31:19+5:302020-05-08T10:32:12+5:30
११० पैकी ७२ एस आर पी एफ जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह

CoronaVirus : औरंगाबाद चारशे पार; ७२ एसआरपीएफ जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह,रुग्णसंख्या ४६८ वर
औरंगाबाद : सातारा परिसरातील भारत बटालियन कॅम्प मधील ११० पैकी ७२ एस आर पी एफ जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली.
मालेगाव येथे दीड महिना लॉकडाऊनचा बंदोबस्त करून परतलेल्या औरंगाबाद राज्य राखीव पोलिस दलाच्या डी कंपनीतील ११० जवानांची ५ मे रोजी परतल्यानंतर जवानांना श्रेयस कॉलेजमध्ये क्वॉरंटाइन करण्यात आले. ६ मे रोजी आरोग्य पथकाने त्यांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी 72 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे डॉ पाडळकर यांनी सांगितले
दरम्यान, शुक्रवारी सकाळी आणखी 18 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील बाधिताचा एकदा 396 झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णात जयभीमनगर 4, बायजीपुरा 3, बेगमपुरा 4, भीमनगर 1, शहाबाजार 1, ध्यान नगर गारखेडा 1, कटकट गेट 1, सिकंदर पार्क 1, मुकुंदवाडी 1, खुलताबाद 1 येथील रुग्णाचा समावेश आहे.