Coronavirus : औरंगाबाद @६२७; आणखी सात पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:37 IST2020-05-11T23:36:44+5:302020-05-11T23:37:08+5:30
जुना बाजार आणि बेगमपुऱ्यात रुग्ण वाढले

Coronavirus : औरंगाबाद @६२७; आणखी सात पॉझिटिव्ह रुग्णांची भर
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात संध्याकाळी सात बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 627 झाली. या रूग्णांमध्ये जुना मोंढा, भवानी नगरमधील एक, जुना बाजार येथील चार, बेगमपुरातील दोन कोरोनाबाधित आहेत.
शहरात सोमवारी आणखी ४० रुग्णांनी कोरोनावर मात केली. शहरात आतापर्यंत १३२ नागरिकांची कोरोनावर विजय मिळविला आहे. दरम्यान, पुंडलीकनगर येथील 58 वर्षीय व्यक्तीचा सोमवारी दुपारी साडेचार वाजता मृत्यू झाला. गेल्या पंधरा तासातील हा दुसरा मृत्यू असून शहरातील हा 15 वा मृत्यू आहे. अशी माहीती डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिली.