coronavirus in Aurangabad : औरंगाबादेत १३ वर्षीय मुलासह ५६ कोरोना रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 12:55 IST2021-05-05T12:54:23+5:302021-05-05T12:55:33+5:30
coronavirus in Aurangabad : जिल्ह्यात उपचारानंतर १,४४६ रुग्णांना सुटी देण्यात आली

coronavirus in Aurangabad : औरंगाबादेत १३ वर्षीय मुलासह ५६ कोरोना रुग्णांचा मृत्यू
औरंगाबाद : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराखाली राहिली. दिवसभरात ९८१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील अवघ्या ३७४, तर ग्रामीण भागामधील ६०७ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १,४४६ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत गंगापूर येथील १३ वर्षीय मुलासह ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ४३ आणि अन्य जिल्ह्यांतील १३ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या ९,७९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २७ हजार ९५८ झाली आहे. आतापर्यंत १ लाख १५ हजार ५३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,६३१ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ८४१ आणि ग्रामीण भागातील ६०५ अशा १,४४६ रुग्णांना सुटी देण्यात आली.
उपचार सुरू असताना घाटीत गंगापूर येथील १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या मुलाला २९ एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी त्याने अखेरचा श्वास घेतला. बालकांचे मृत्युसत्र काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे. यासह सिल्लोड येथील ४५ वर्षीय महिला, लाडसावंगी येथील ६२ वर्षीय महिला, नक्षत्रवाडी येथील ४९ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडी येथील ५५ वर्षीय महिला, राहुलनगर येथील ८० वर्षीय महिला, सिल्लोड येथील ७५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ८५ वर्षीय महिला, वैजापूर येथील ७८ वर्षीय महिला, रामकृपा कालनीतील ६१ वर्षीय महिला, पैठण येथील ५२ वर्षीय महिला, ७५ वर्षीय पुरुष, सातारा परिसरातील ७२ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ४० वर्षीय पुरुष, ४७ वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा येथील ५२ वर्षीय पुरुष, बारी काॅलनी येथील ६० वर्षीय महिला, पद्मपुरा येथील ६५ वर्षीय महिला, हडकोतील ७४ वर्षीय पुरुष, शेनपुंजी येथील ६० वर्षीय पुरुष, देवळाई येथील २८ वर्षीय महिला, कन्नड येथील ६७ वर्षीय महिला, पिंपळगाव, वैजापूर येथील ८५ वर्षीय महिला, कोलठाणवाडी येथील ८० वर्षीय पुरुष, गेवराई येथील ४७ वर्षीय पुरुष, पैठण येथील ७८ वर्षीय महिला, वाळूज येथी०ल ५५ वर्षीय पुरुष, सोयगाव येथील ५५ वर्षीय पुरुष, भोईवाडा येथील ८० वर्षीय पुरुष, एन-७ येथील ५० वर्षीय पुरुष, एन-६ येथील ६६ वर्षीय महिला, मातानगर, हर्सूल येथील ६५ वर्षीय महिला, लिहाखेडी, सिल्लोड येथील २८ वर्षीय पुरुष, वाहेगाव, गंगापूर येथील ४२ वर्षीय महिला, पोफळा, फुलंब्री येथील ५५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ७५ वर्षीय महिला, वाळूज येथील ७८ वर्षीय पुरुष, उस्मानपुरा येथील ३१ वर्षीय पुरुष, चिकलठाणा येथील ९१ वर्षीय पुरुष, भगतसिंगनगर येथील ७७ वर्षीय पुरुष, समर्थनगर येथील ७४ वर्षीय महिला, गारखेड्यातील ८० वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर येथील ५५ वर्षीय महिला आणि अहमदनगर जिल्ह्यातील ५० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुष,५२ वर्षीय महिला, ४५ वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरुष, भेंडा फॅक्टरी येथील ३६ वर्षीय पुरुष, शेवगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, परभणी जिल्ह्यातील २४ वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, लातूर येथील ३२ वर्षीय पुरुष, बीड जिल्ह्यातील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद ४, बीड बायपास ५, गारखेडा परिसर ६, सातारा परिसर २०, शिवाजीनगर ३, स्नेहनगर १, शांतिपुरा 2, कांचनवाडी ७, अलोकनगर ५, एलएनटी कॅम्प १, देवळाई २, पुंडलिकनगर ४, मुकुंदवाडी २, मिलकॉर्नर ३, समर्थनगर १, केळीबाजार १, भोईवाडा १, म्हाडा कॉलनी १, किराणा चावडी १, राजनगर १, शहानूरवाडी १, केशवनगरी १, सुधाकरनगर १, काल्डा कॉर्नर १, एकनाथनगर १, एन-९ येथे ९, एन-७ येथे ५, एन-८ येथे ५, एन-६ येथे २, आंबेडकरनगर १, जटवाडा रोड २, जाधववाडी २, होनाजीनगर २, हर्सूल ४, एन-५ येथे ५, चिकलठाणा २, जयभवानीनगर ४, एमजीएम कॉलेजसमोर १, सूरेवाडी १, हर्सूल मध्यवर्ती कारागृह १, मयुर पार्क ३, अंबर हिल ३, पवननगर २, गाडगे महाराज आश्रम २, नंदनवन कॉलनी ४, बेगमपूरा २, न्यु नंदनवन कॉलनी १, बालाजीनगर ३, पहाडसिंगपूरा १, रोजाबाग १, जयसिंगपुरा १, लेबर कॉलनी १, एन-२ येथे ३, चिकलठाणा एमआयडीसी ३, समृद्धीनगर १, प्रकाशनगर २, विश्रांतीनगर ३, एन-१ येथे ३, लघुवेतन कॉलनी १, गणेशनगर १, जय विश्वभारती कॉलनी १, घाटी ३, मातोश्रीनगर १, हनुमाननगर १, रेणुकानगर १, सूतगिरणी १, व्यंकटेश कॉलनी १, देवळाई चौक १, त्रिमूर्ती चौक १, विद्यानगर १, नंदीग्रुप कॉलनी १, ज्ञानेश्वरनगर १, एन-३ येथे १, भावसिंगपुरा १, शिवशंकर कॉलनी १, किलेअर्क कोविड केअर सेंटर १, एन-१० येथे २, मिसारवाडी १, एमजीएम स्टाफ १, नारेगाव १, उल्कानगरी १, सहारानगर १, सुधाकरनगर २, गुलमंडी १, बनेवाडी १, काल्डा कॉर्नर १, पद्मपुरा २, पडेगाव ५, एन-११ येथे १, कांचननगर २, कोवल हॉस्पिटल १, बायजीपुरा १, अल्तमेश कॉलनी २, विशालनगर १, पीडब्ल्यूडी क्वाॅर्टर उस्मानपुरा १, भीमनगर १, पुष्पनगरी १, कश्मीरनगर १, गजानननगर १, रामानंद कॉलनी क्रांती चौक १, तापडियानगर, दर्गा रोड १, स्काय सिटी १, सीआयएसफ एअरपोर्ट १, आकाशवाणी २, दर्गा रोड १, संजयनगर १, समतानगर क्रांती चौक १, पेठेनगर १, राजनगर, क्रांती चौक १, छत्रपतीनगर १, सहकारनगर ३, क्रांती चौक १, गजानन मंदिर १, भगीरथनगर २, देशमुखनगर १, जालाननगर १, रामनगर १, मेडिअम रेसिडेन्ट १, प्रतापनगर १, मोतीवालानगर १, अन्य १३४
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर १०, सिडको महानगर-१ येथे २, वडगाव १, सिडको वाळूज २, वाळूज एमआयडीसी १, रांजणगाव १, जेहूर, ता. कन्नड १, लाडसावंगी १, तांदूळवाडी १, पिसादेवी ६, सावंगी २, उपळा ता. कन्नड २, पळशी १, खुल्ताबाद १, वाहेगाव १, धामणगाव ता.खुल्ताबाद १, उंडनगाव ता.सिल्लोड २, फुलंब्री १, शेवता १, गदाना, ता.खुल्ताबाद १, ईटकोनी, ता.पैठण १, भारतनगर, घाणेगाव १, माळीवाडा १, मालेगाव, ता. कन्नड १, सिल्लोड २, अंजिठा ता. सिल्लोड १, वरूड १, पुरणगाव, ता. वैजापूर १, वाकडी कुकणा १, सराई, ता. खुल्ताबाद १, पिरबावडा १, वैजापूर १, पिंप्री राजा १, शास्त्रीनगर १, खांडेवाडी २, अन्य ५५१