coronavirus : औरंगाबाद @ १३९७; नव्या भागातील संक्रमणासह आणखी ३५ बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 09:14 IST2020-05-28T09:13:37+5:302020-05-28T09:14:34+5:30
कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या संजयनगर येथे पुन्हा रुग्ण आढळून आला

coronavirus : औरंगाबाद @ १३९७; नव्या भागातील संक्रमणासह आणखी ३५ बाधितांची भर
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (दि. २८) सकाळी प्राप्त अहवालात आणखी ३५ जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा एकदा १३९७ झाला आहे.
बायजीपुरा १, मिसारवाडी १, वाळूज महानगर एक- बजाज नगर १, संजय नगर १, शहागंज १, हुसेन कॉलनी १, कैलास नगर १, रोकडिया हनुमान कॉलनी १, उस्मानपुरा १, इटखेडा १, एन-४ येथील ३, नारळीबाग २, हमालवाडी ४, रेल्वे स्टेशन परिसर २, सिटी चौक १, नाथ नगर १, बालाजी नगर १, साई नगर एन ६ येथील १, संभाजी कॉलनी, एन ६ येथील २, करीम कॉलनी रोशन गेट १, अंगुरी बाग १, तानाजी चौक, बालाजी नगर १, एन अकरा हडको १, जय भवानी नगर २, अन्य १ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये १४ महिला आणि २१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
नव्या भागात संक्रमण
अंगुरी बाग, नाथ नगर, साई नगर एन ६, रोकडीया हनुमान कॉलनी या नव्या परिसरात कोरोनाचा नव्याने संसर्ग झाला. तर कोरोनामुक्ती च्या वाटेवर असलेल्या संजयनगर येथे रुग्ण आढळून आला आल्याने चिंतेत भर पडली आहे.