शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

CoronaVirus : औरंगाबादमध्ये आतापर्यंत १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 22:37 IST

त्या रुग्णांच्या संपर्कातील लोक आणि त्या भागातील लोकांची तपासणी करण्यात येत असून, आरोग्य यंत्रणा आता कामाला लागली आहे. 

औरंगाबाद : शहरातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या १०वर पोहोचली असून, प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या रुग्णांमध्ये एन ४मध्ये ३, सातारा परिसर १, देवळाई १, जलाल कॉलनी २, अरिफ कॉलनी १ आणि रोशन गेट १ अशा रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील एकाचा मृत्यूसुद्धा झाला आहे. दरम्यान, औरंगाबादचे  महापौर नंदकुमार घोडेले यांनी नागरिकांना कुठेही बाहेर न जाता घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. ज्या भागात रुग्ण आढळले आहेत. त्या रुग्णांच्या संपर्कातील लोक आणि त्या भागातील लोकांची तपासणी करण्यात येत असून, आरोग्य यंत्रणा आता कामाला लागली आहे. औरंगाबादेत रविवारी एका ५८ वर्षीय कोरोनाबाधित बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी ठरला असून, बँक अधिकाऱ्यासह एकाच दिवशी ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यात एका चिमुकलीचाही समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनाबधित रुग्णाच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणा, मनपा आणि जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. १३ दिवसांपूर्वीच ते शहरात आले हॊते. शहरात आल्यानंतर प्रकृती बिघडल्याने ३ मार्च रोजी सायंकाळी कोरोनाच्या संशयाने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी तपासणीसाठी त्यांच्या घशातील स्राव (स्वब)तपासणीसाठी घेण्यात आला. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला. हा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दुर्देवाने उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.बँक अधिकाऱ्यासह ७ जणांचे कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले. यात हिमायतनगर, जलाल कॉलनी येथील ७९ वर्षीय रुग्णाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णास अधिक उपचारासाठी घाटीतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याबरोबरच जिल्हा रुग्णालयात दाखल दोन कोरोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे घाटी प्रयोगशाळेने संकेत शनिवारी रात्री उशिरा दिले होते. या दोघांत आरेफ कॉलनीतील एका ४५ वर्षीय महिलेचा आणि देवळाईतील एका ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामुळे या दोघांवर शनिवारी रात्रीच पॉझिटिव्ह रुग्णांवर केले जाणारे उपचार सुरू करण्यात होते. या दोघांचाही अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला.तर खाजगी रुग्णालयात दाखल सात वर्षाची मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले. पदमपुरा येथील रहिवाशी असलेले ४३ वर्षीय डॉक्टर आणि पदमपुरा येथील ३७ वर्षीय व्यक्तीचा रविवारी सायंकाळी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर डॉक्टर हे जालना रोडवरील एका खाजगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी (आर एम ओ) म्हणून कार्यरत आहेत.१) आरेफ कॉलनी येथील ४५ वर्षीय महिला२) देवळाई येथील ३८ वर्षीय वाहनचालक३) सह्याद्रीनगर येथील ५८ वर्षीय बँक अधिकारी-मृत्यू४)जलाल कॉलनी, हिमायतनगर येथील ७९ वर्षीय व्यक्ती५) एन- ४ येथील सात वर्षीय मुलगी६) पदमपुरा येथील ४३ वर्षीय डॉक्टर७) रोशन गेट येथील ३७ वर्षीय व्यक्ती८) एन - ४ येथील पोजिटिव्ह महिला९) आरेफ कॉलनी येथील पॉझिटिव्ह तरुण१०) शहरातील पहिली पॉझिटिव्ह रुग्ण, प्राध्यापिका, जी आता निगेटिव्ह 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद