CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी एक रुग्ण;आसेफिया कॉलनीतील महिला कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 18:00 IST2020-04-20T17:58:21+5:302020-04-20T18:00:05+5:30
यासोबतच रुग्णसंख्या ३२ वर पोहोचली आहे.

CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी एक रुग्ण;आसेफिया कॉलनीतील महिला कोरोना पॉझिटिव्ह
औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढतच जाणार ठरत आहे. सोमवारी आसेफीया कॉलनीतील ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. यासोबतच रुग्णसंख्या ३२ वर पोहोचली आहे.
रविवारी पाच व सोमवारी सहा अशा ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र यासोबतच शहरात रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक ठरत आहे. सोमवारी शहरातील आसेफीया कॉलनी येथील ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. हा भाग बिस्मिला कॉलनीच्या बाजूचा आहे,यापूर्वी बिस्मिला कॉलनीत एक महिला पॉझिटिव्ह आढळून आली होती. यामुळे प्रशासनाने तातडीने या भागात पुढील कारवाई सुरू केली आहे. यासोबतच शहरातील रुग्णसंख्या ३२ वर गेली आहे.