CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी ८ जण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या @२९१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 09:01 IST2020-05-04T09:00:21+5:302020-05-04T09:01:50+5:30
पुंडलिक नगर या नव्या ठिकाणाची भर

CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी ८ जण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या @२९१
औरंगाबाद : औरंगाबादेत सोमवारी सकाळी आणखी ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे रुग्ण किलेअर्क, नंदनवन कॉलनी आणि पुंडलीकनगर येथील रहिवासी आहेत. पुंडलीकनगरच्या माध्यमातून एका नव्या हॉटस्पॉटची शहरात भर पडली आहे.