CoronaVirus : ७ वर्षीय मुलीने जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई; रुग्णालयातून मिळाली सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 19:38 IST2020-04-18T19:37:47+5:302020-04-18T19:38:23+5:30
शहरात २ एप्रिल रोजी एन-४ येथील महिला कोरोनाबाधित आढळून आली.

CoronaVirus : ७ वर्षीय मुलीने जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई; रुग्णालयातून मिळाली सुटी
औरंगाबाद : खाजगी रुग्णालयात दाखल ७ वर्षीय मुलीने कोरोनावर मात केली आहे. तिचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
शहरात २ एप्रिल रोजी एन-४ येथील महिला कोरोनाबाधित आढळून आली. तिच्या पतीसह अन्य नातेवाईक कोरोना निगेटिव्ह आढळले. मात्र महिलेची सात वर्षीय नातीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आणि एकच खळबळ उडाली. शहरात पहिल्यांदाच एका लहान मुलीला कोरोनाची बाधा झाली. या मुलीवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्याच्या परिस्थितीत एखादा व्यक्ती शिंकला, खोकलला तर इतर लोक चार हात दूर पळतात. मात्र, चिमुकलीवर ओढवलेल्या परिस्थितीत तिची आई तिच्यासोबत उभी होती. अखेर तिचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या आता ३ झाली आहे.