coronavirus : औरंगाबादेत आणखी ७ बाधितांची वाढ; रुग्णसंख्या २२७१ वर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:31 IST2020-06-10T16:31:16+5:302020-06-10T16:31:53+5:30

यामध्ये २ महिला आणि पाच पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

coronavirus: 7 more infected in Aurangabad; At 2271 patients | coronavirus : औरंगाबादेत आणखी ७ बाधितांची वाढ; रुग्णसंख्या २२७१ वर 

coronavirus : औरंगाबादेत आणखी ७ बाधितांची वाढ; रुग्णसंख्या २२७१ वर 

ठळक मुद्देजिल्ह्यात दिवसभरात १२१ बाधितांची वाढ

औरंगाबाद :  जिल्ह्यात बुधवारी सकाळी विक्रमी ११४ बाधितांची वाढ झाल्यानंतर दुपारी आणखी ७ बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरात १२१ बाधितांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २२७१ झाली आहे. 

दुपारी आढळलेल्या रुग्णांत गल्ली नं.३ कैलास नगर १, रोशन गेट १, गल्ली नं.२ पुंडलिक नगर १, खोकडपुरा १, जय हिंद नगर, म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर एन २, सिडको १, सिल्क मिल कॉलनी १, नंदीग्राम कॉलनी, गारखेडा परिसर १ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २ महिला आणि पाच पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
 

Web Title: coronavirus: 7 more infected in Aurangabad; At 2271 patients